वैनगंगा नदीत बुडून 65 वर्षीय इसमाचा मृत्यू- पंधरवड्यातील दुसरी घटना.

Bhairav Diwase
ऋषी बीजा रोहणे यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू.
    Bhairav Diwase. April 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
मुल: मुल पोलीस ठाणे,  बेंबाळ पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या जुनगाव येथील वैनगंगा नदीत बुडून एका 65 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याच नदीवरील या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. पंधरा दिवसापूर्वी मुल पोलीस ठाणे अंतर्गतच येरगाव येथील मडावी नामक इसमाचा नाव उलटून मृत्यू झाला होता.
       याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृतक ऋषी बिजा रोहने, वय 65 वर्ष राहणार चंदनखेडी, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी आहेत. ते मागील चार-पाच महिन्यापासून पिपरी देशपांडे येथील नितीन पाल यांचेकडे कामाला होते. व त्यांचे कडेच राहात होते. दरम्यान काल तारीख 22 एप्रिल रोजी चामोर्शी तालुक्यातील भिक्षी माल येथे गेले. त्यांचे सोबत पिपरी देशपांडे येथीलच आपले अन्य दोन सहकारी, नामे शरद सुर्याजी झबाडे वय 35, व संतोष जोंधरू शेंडे वय 27 हे होते. तिघेही जण मिळून जुनगाव मार्गे वैनगंगा नदी नावेने पार करून भिक्षीमाल येथे गेले. तिथे जाऊन त्यांनी दारू प्राशन केली., व तिघांपैकी एक जण भिक्षी माल येथे मुक्कामाने राहिला. दोघेजण परत येत असताना नावाडी त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पाण्यात शिरून पार होण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात ऋषी बीजा रोहणे यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती पिपरी देशपांडे येथील पोलीस पाटील ओमदास पाल यांना माहीत होताच त्यांनी याची माहिती  सबंधित नातेवाईकांना दिली. जुनगाव येथील पोलीस पाटील कान्होजी भाकरे यांनी बेंबाळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन मूल येथे शवविच्छेदन केंद्रात पाठवण्यात आला. मृतकाच्या मागे दोन मुलं, एक मुलगी, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
      घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल कान्हू रायपुरे, देविदास वेलादी, तीतर्मारे, पोलीस गाईड सिद्धू भडके हे करीत आहेत.