Top News

गोंडपिपरी शहरातील नागरिकांना जागतिक ग्रंथ दिनानिमत्ताने ग्रंथ व मास्कचे वितरण.

गोंडपिपरी शहरातील नागरिकांना सोशल डिस्टसिंग  ठेवत जागतिक ग्रंथ दिनाचे औचित्य साधून ग्रंथ व मास्क भेट देऊन जागतिक ग्रंथ दिन उत्साहात साजरा.
Bhairav Diwase.   April 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी :- स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. तेजराव पाटील यांचे हस्ते जागतिक ग्रंथ दिनानिमित्ताने कोरुना मुक्तीसाठी मास्क व अज्ञान मुक्तीसाठी ग्रंथ हे उद्दिष्ट घेवून आज शहरात ग्रंथ व मास्कचे वितरण करण्यात आले.
करणा-या महामारी संकटामुळे सध्या सर्वत्र सुरू असलेल्या लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर आज शहरातील कला वाणिज्य महाविद्यालय येथील ग्रंथ विभाग प्रमुख प्रा. तेजराव पाटील यांनी कोरूना मुक्ती साठी मास्क व अज्ञान मुक्तीसाठी ग्रंथ हे उद्दिष्ट घेऊन शहरातील नागरिकांना सोशल डिस्टसिंग  ठेवत जागतिक ग्रंथ दिनाचे औचित्य साधून ग्रंथ व मास्क भेट देऊन जागतिक ग्रंथ दिन उत्साहात साजरा केला. तर नागरिकांनीदेखील ग्रंथ व मास्कचा स्वीकार करत कला व वाणिज्य महाविद्यालयाचे तथा ग्रंथ विभाग व विभाग प्रमुख प्रा. तेजराव पाटील यांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने