जि प. अध्यक्षांची प्रा. आ. केन्द्र नवरगाव ला सदिच्छा भेट.
Bhairav Diwase. April 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
सिंदेवाही: जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी नवरगाव प्रा. आ. केंद्राला कोरोणा विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट दिली. आणि प्रा. आ. केंद्रातिल वैद्यकीय अधिकाऱ्यांसह उपस्थित कर्मचारी, अंगणवाडी मदतनीस आणि आशा वर्कर यांच्याशी स्थानिक आरोग्यासंबंधी अनेक विषयांवर चर्चा करत स्थितीचा आढावा घेतला.
तसेच याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, दिवसेंदिवस देशात कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती विदारक होत चालली आहे. त्यामुळे याचा फटका जिल्ह्याला बसू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपयोजना आखल्या जात आहेत. आणि सुदैवाने जिल्ह्यात एकही बाधित नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आणि सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. जेणेकरून आपण या महामारीपासुन स्वतःचे रक्षण करू शकू. त्याकरिता सर्व नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी त्यांसमवेत जि. प. समाजकल्याण सभापती नागराजजी गेडाम, पं. स. रितेश अलमस्त यांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. कावळे मॅडम, परिसरातील आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस तसेच प्रा. आ. केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.