Click Here...👇👇👇

जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून सिंदेवाही पंचायत समितीत सॅनिटयझरचे वाटप.

Bhairav Diwase
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांकडून घेतला विविध विभागांचा आढावा.

तालुक्यात सर्वांना स्वच्छता पाळण्यासाठी आग्रह धरण्याचे दिले अधिकार्‍यांना निर्देश.
Bhairav Diwase. April 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
सिंदेवाही: कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांच्या सेवेसाठी सरकारी कार्यालय आणि तत्संबंधी अत्यावश्यक संस्था सुरू आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी नागरिकांची ये-जा असते. आणि आलेल्या अभ्यागत नागरिकांचा व अधिकारी कर्मचाऱ्यांचा जवळून संपर्क येतो. हे लक्षात घेऊन खबरदारी परतण्यासाठी जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सिंदेवाही पंचायत समितीला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांसह कर्मचार्‍यांना सॅनिटयझरचे वाटप केले. आणि ग्रामीण भागात नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर यांच्यासाठी ही CDPO आणि TMO यांचेकडे त्यांच्यावतीने सॅनिटयझरचे वाटप करण्यात आले. 
तसेच उपस्थित अधिकाऱ्यांकडुन त्यांच्यावतीने चालू असलेल्या विभागवार कामाचा आढावा त्यांनी आज घेतला. ज्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सुरू असलेल्या आणि रखडलेल्या कामांविषयी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच लघुसिंचन अंतर्गत करण्यात येत असलेले विविध बांधकाम व दुरुस्ती यांचीही स्थिती आणि सद्यस्थितीत काय उपाययोजना सुरू आहेत याविषयी अधिकार्‍यांना विचारणा करत अनेक सूचना त्यांनी केल्या. तसेच महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ICDS मध्ये कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे कामास होणाऱ्या अडचणींच्या संदर्भातही त्यांनी माहिती घेतली. तसेच तालुक्यात १० गावे पाणीटंचाईग्रस्त आहेत त्यासंदर्भात सुद्धा त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली. आणि मनरेगाचे कामे करत असतांना सोशल डिस्टेंसिंगचे काटेकोरपणे पालन करूनचं कामे पार पाडा अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केली. तसेच गावपातळीवर ग्रामपंचायतीतर्फे गावामध्ये निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी कशाप्रकारे करण्यात येत आहे. याबद्दल ही त्यांनी माहिती घेतली. आणि उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी स्थानिक आरोग्यासंबंधी अनेक विषयांवर चर्चा करत स्थितीचा आढावा मागितला. 
तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आणि शाळास्तरावर देखिल स्वच्छतेला प्राधान्य देऊनचं कार्य करण्याचे निर्देश द्या. अशीही सूचना अधिकार्‍यांना दिली. आणि या महामारीचे वाढते प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपणही सुरक्षितता राखूनचं आरोग्याची काळजी घेत काम करा. असे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले. 
याप्रसंगी सिंदेवाही पं. स. संवर्ग विकास अधिकारी अशोक इल्लुरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी नितिन जांभुळकर, गटशिक्षणाधिकारी संजय तालवे, उपअभियंता (सिंचाई) विजय नोमुलवार, उपअभियंता (ग्रा. पा. पु.) गिरिश बारसागडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मानकर यांसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.