उपाययोजने विषयी आढावा बैठक.
Bhairav Diwase. April 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली:- सावली तालुक्यातील ग्राम पंचायती मार्फत स्थापण करण्यात आलेल्या कोरोना प्रतीबंध नियंत्रन पथक चे माध्यमातुन प्रतीबंधाक्तम उपाययोजने विषयी आढावा बैठक ग्रामपंचायतीचे प्रशासक अ.दा.वाळके यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. शासनाच्या निर्देशाची काटेकोर अंमलबजावनी व्हावी याकरीता दक्षता पथकाच्या प्रतीनीधींना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकी दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या कोरेना प्रतीबंधात्मक शासन निर्देशा नुसार, कोवीड-१९ अंतर्गत कोरोना विषानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम पंचायत स्थरावर काम करणा-या कर्मचा-यांना प्रोत्साहन पर भत्ता वाटप, व जिवन विमा काढण्याविषयी तांत्रीक चर्चा करण्यात आली, बाहेर गावातुन कामावरुन आलेल्या गावातील मजुरांना १४ दिवस होम कोरेंन्टाईन करण्यात आले होते. अशा कुटुंबाच्या गहृभेटी व विहित नमुन्यात पुनर्सर्वेक्षण, करणे, गावातील गरजु कुटुबीयांना जिवनावश्यक साहीत्याचे वाटप, मा.पालक मंत्री यांचे मार्फत राँसन कार्ड नसलेल्या व्यक्तींकरीता पाठविण्यात आलेल्या जिवनावश्यक साहीत्याच्या वाटपाविषयी माहीती, केंद्र व राज्य शासना मार्फत कार्डधारकांना मोफत धान्यवाटपा विषयी माहीती घेण्यात आली, आरोग्य विभागाच्या टिम सोबत काम करणा-या स्वयंसेवक तथा कर्मचा-यांना सँनीटायझर,हँंन्डग्लोब,मास्क पुरवठा करण्या विषयी सुचना करण्यात आल्या, त्यासोबतच कोरोना प्रतींबंधाकरीता गावातील रस्ते ,व शासकीय ईमारती, अंगणवाडी, शाळा, दवाखाना, यामध्ये सोडीअम हायड्रोक्लोराईड ची पुनर्फवारणी करण्याविषयी सुचना तरण्यात आल्या. गोसेखुर्द प्रकल्पाचे माध्यमातुन करण्यात येणा-या कंत्राटदाराकडे काम करणारे गोंदिया जिल्ह्यातील चार मजुरां विषयी सक्त निर्बंध लावुन त्यांची आरोग्य तपासनी करुन होम कोरेन्टाईन करुन दुस-या कुठल्याही व्यक्ती़सोबत संम्पर्क येवु नये या विषयी कडक उपाययोजना करण्याबाबत दक्षता पथकाला सुचना करण्यात आल्या, कोणत्याही परि्स्थीतीत
गावात नव्याने येणा-या नविन व्यक्तींना प्रवेश देतांना सुरक्षात्मक बाबीं कडे जातीने लक्ष देण्याविषयी व ग्रावस्थरावर स्वयंनियोजन करण्याविषयी जागरुक ग्रामस्थांचे सहकार्य घेण्याविषयी दक्षता पथकाला सांगण्यात आले, यावेळी अँलोपँथीक दवाखाण्याचे वैद्यकीय अधिकारी डाँ.राहुल वासनीक, सामाजीक कार्यकर्ते तथा दैनीक लोकमतचे पत्रकार दिलीप फुलबांधे. ग्रामपंचायत सचिव यु.आर धारणे. आरोग्य सेविका सौ.एल एन गद्देवार,आरोग्य सहाय्यक अलोणे.अंगणवाडी सेवीका सौ.कुंता वाकडे.सौ.छाया सादमवार, आशा वर्कर,ललीता वाकडे, स्वस्त धान्य दुकानदार वामन भोयर.प्रभारी पोलीस पाटील दुर्वास गायकवाड, ग्राम पंचायतीचे कर्मचारी, संदिप जनबंधु, मोरेश्वर धारणे, उपस्थित होते.