Top News

पोंभुर्णा शहरात शिव भोजन योजना चालू करण्यात यावी:- मा. श्री राहुल भाऊ संतोषवार जिल्हा परिषद सदस्य यांची मागणी.

मा. श्री राहुल भाऊ संतोषवार जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व कृषी समिती जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कडून मा श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना पत्र.
   Bhairav Diwase.   April 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात घोषित करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरिबांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना दोन वेळच्या अन्नासाठी मोठा प्रश्न भेडसावत आहे. पोंभुर्णा  तालुक्यामध्ये महसूलची गावे 71 येतात. पोंभुर्णा तालुका आदिवासी बहुल असल्यामुळे पोंभुर्णा तालुक्यात मजूर व गरीब कुटुंब मोठ्या प्रमाणात आहे. पोंभुर्णा तालुक्याचा मानवनिर्देशांक दरडोई उत्पन्न कमी आहे. त्यामुळे बरेचसे ग्रामीण भागातील लोक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती, तहसिल कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व बँकेत ये-जा करतात. त्यामुळे त्यांना जेवणाच्या सोयीकरिता महाराष्ट्र शासनाच्या शिव भोजन योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून पोंभूर्णा शहरात शिव भोजन योजना चालू करण्यात यावी. 
असे पत्र  मा. श्री राहुल भाऊ संतोषवार जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व कृषी समिती जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी आज मा श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन, वने मंत्री, तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना दिले. सुधीर भाऊ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून पोंभुर्णा शहरात शिव भोजन योजना चालू करतील. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने