Top News

जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या कडून किटचे वाटप.

चेकहत्तीबोडी, डोंगरहळदी, गोमपाटील तुकुम, बोर्डा झुल्लूरवार, घनोटी तुकुम या गावातील निराधार, अपंग, विधवा या गरजू व्यक्तींना मदत.
   Bhairav Diwase.   April 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: देश सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना, संस्था, व्यक्ती या लढाईत आप-आपला योगदान  देत आहे. काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे . चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर गोरगरिबांची सेवा करणारे लोकनेते विकास पुरुष मा. आ सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन, वन मंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे, यांच्या मार्गदर्शन खाली कोविड-१९ या महामारीचा मुकाबला करण्यासाठी, प्रत्येक दिवस जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी आज मौजा चेकहत्तीबोडी, डोंगरहळदी, गोमपाटील तुकुम, बोर्डा झुल्लूरवार, घनोटी तुकुम या गावातील निराधार, अपंग, विधवा या गरजू व्यक्तींना काही जीवनावश्यक वस्तूंच्या किटची मदत करण्यात आली. मा. श्री राहुल भाऊ संतोषवार यांच्या सोबत त्या गावातील सरपंच ,व भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने