भांगडिया फाऊंडेशन व भाजपा तर्फे सावली तालुक्यात गोर-गरीब मजुरांना अन्नधान्य किट वाटप.

Bhairav Diwase
गोर गरीब कुटुंबियांना अन्नधान्य व जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात.
Bhairav Diwase.   April 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: कोरोना मुळे लॉक डाऊन सुरू आहे त्यामुळे अनेक गरीब मजुरांना काम नाही त्यामुळे याचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे भारतीय जनता पार्टी व भांगडीया फाऊंडेशन च्या वतीने आज दिनांक 16 एप्रिल ला चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचा हस्ते , चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा जिल्हा विधान परिषद माजी. आमदार जनसेवक मितेश भांगडिया यांचे प्रमुख उपस्थितीत भांगडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांतजी भांगडिया यांचे सहकार्याने व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजीआमदार अतुल देशकर व  जि. प.माजी.सभापती संतोष तंगडपल्लीवार,भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल,तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, दिलीप ठिकरे  यांचे स्वहस्ते गोर गरीब कुटुंबियांना अन्नधान्य व जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. तसेच सावली तालुक्यात पाथरी, पालेबारसा, निफांद्रा, व्याहाड खुर्द व्याहाड बुज, हरांबा, उसेगाव, सावली, बोथली येथे वाटप करण्यात आले. कोरोणा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून सर्वत्र वाटप करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष  अविनाश पाल,महामंत्री सतीश बोम्मावार,दिलीप ठिकरे,उपसभापती रवींद्र बोलीवार, जिल्हा परिषद सदस्य योगिता डबले, पं स सदस्य गणपत कोठारे, तुकाराम ठिकरे, देवराव मुद्दमवार, प्रकाश गड्डमवार डॉ.कवठे, अरुण पाल, पूनम झाडे, विलास कावडे, सावली शहर अध्यक्ष चंद्रकांत संतोषवार,  शरद सोनवणे यांनी अथक परिश्रम घेतले.