कोसोदूर असणाऱ्या पत्नीचा मृतक पतीसाठी हंबरडा तेलंगणातून आणण्यासाठी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला मोठ यश.

आई व मुलांची भेट आज सकाळी झाली आहे. पण आई व आजोबा होमक्वारन्टाइन घरीच करून असल्यामुळे मुलाना जवळ जाऊन दिलासा देऊ शकत नाही.
Bhairav Diwase.   April 19, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊनची स्थिती असताना उपरी येथील इसमाचा मृत्यू झाला पण पत्नी तेलंगणात असल्याने शेवटचे दर्शन घेता आले नाही . मात्र मुलांना धीर देण्यासाठी आईला घरापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आशिष मनबतुलवार यांनी केले व आई व मुलांची भेट घडली. 
     तालुक्यात खेडी नंतर ही दुसरी मन हेलावून टाकणारी घटना उपरी येथे घडली. उपरी येथील नरेंद्र पत्रुजी पेंडलवार व पत्नी, दोन मुलांसह मिळेल त्या मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. गावातील शेकडो मजुर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याचे कामाकरिता गेले. असता मृतकाची पत्नी अश्विनी पेंडलवार ही सुद्धा आपल्या 9 व 4 वर्षाच्या मुलांना पतीसोबत ठेऊन मजुरीसाठी गेली. मजुरांसोबत काम करून आपल्या कुटुंबासाठी कष्ट करीत असताना, कोरोनाच्या प्रदूर्भावाने संचारबंदीत ही सुद्धा प्रभावित झाली, व सोबतच्या मजुरांसोबत लॉकडाऊन खुलेल तेव्हा जाऊ. या आशेवर होती मात्र शुक्रवारची रात्र काळरात्र ठरली. नरेंद्रची तब्येत खालावली शेजाऱ्यांनी उपचाराकरिता चंद्रपूर नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. ही बातमी पत्नीला कळली मात्र अश्रूशिवाय येण्याचा काहीच पर्याय नव्हता. मृतकाची पत्नी व वडील अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहू शकले नाही. त्यांचे अनुपस्थित अंत्यसंस्कार पार पडले. परंतु लहान मुलांना या कठीण प्रसंगी धीर देणारी आई नसल्याने केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून मन सुन्न होत असल्याने, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा सरपंच आशिष मनबतुलवार यांनी जिल्हा प्रशासन व तेलंगणा प्रशासनाकडे प्रयत्न केले. तेलंगणा राज्यातील खंमम जिल्ह्यातील कामेपल्ली तहसीलदार यांच्यासोबत फोनवर संपर्क करून आपबिती सांगितली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तेथील तहसिलदार यांनी पोहचवून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे आई व मुलांची भेट आज सकाळी झाली आहे. पण आई व आजोबा होमक्वारन्टाइन घरीच करून असल्यामुळे मुलाना जवळ जाऊन दिलासा देऊ शकत नाही.
या घटनेतील मिळविलेल्या यशाबद्दल जिल्हाभरात ऊपरी येथील सरपंच तथा युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष यांची स्तुती केल्या जात आहे.ही च तत्परता खेडी येथील नागरिकांनी  दाखविली असती तर ती सुध्दा बाई परत आली असती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने