खासदार अशोकभाऊ नेते यांचे तर्फे सावली तालुक्यात सेनिटॉयझर व मास्कचे वाटप.

Bhairav Diwase
कार्यालय, बॅक, आरोग्य केंद्र दवाखाना व नागरीकांना मास्कचे व सॅनिटायझर चे वितरण.
 Bhairav Diwase.   April 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: सावली तालुक्यात  अशोकजी नेते साहेब यांच्या पुढाकाराने सॅनिटायझर व मास्क चे वितरण आज गुरुवार ला दि ९/४/०२० ला विविध कार्यालय बॅक आरोग्य केद्र दवाखाना व नागरीकाना मास्कचे व  सॅनिटायझर चे वितरण करण्यात आले.आज देशात व राज्यात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक सेवा देणारे कर्मचारी सेवा देत आहेत त्यामुळे त्यांना व नागरिकांना लागन होऊ नये म्हणून मास्क व सेनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पदाधिकारी तालुका महामंत्री सतीश बोम्मावार,शहर अध्यक्ष चद्रंकांत संतोषवार, प्रकाश पा गड्डमवार, पत्रकार राकेश गोलेपल्लीवार, इम्रान शेख, अतुल लेनगुरे, गुरूदास कोसरे,राहुल लोडेल्लीवार, प्रफुल येनुरवार, सुदर्शन चामलवार आदि कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते