Top News

पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत चेक हत्तीबोडी रा लच्छमपुर येथे पिण्याच्या पाण्याची टंचाईची समस्या दुर. पाईप लाईन च्या कामाला कालपासून प्रत्यक्ष सुरवात.

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राहुल भाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर आणि सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांच्या प्रयत्नांना यश.
  Bhairav Diwase.   May 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा:- आता उन्हाळा चालू झाल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. गाई गुरांना पाणी शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. व गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पडतो. असच पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत चेक हत्तीबोडी रा लच्छमपुर येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.         ग्रामपंचायत चेक हत्तीबोडी अंतर्गत येत असलेल्या मौजा लच्छमपूर गावात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राहुल भाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर आणि सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी लच्छमपुर येथे जाऊन गावाची पाहणी केली होती. त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील पाणी टंचाईची समस्या दुर करण्यासाठी प्रयत्न करीन असा गावातील नागरिकांना शब्द दिला होता.        त्या पार्श्वभूमीवर 14 वा वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत चेक हत्तीबोडी अंतर्गत येत असलेल्या मौजा लच्छमपूर येथे केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे सन्मानीय सदस्य श्री.राहुलभाऊ संतोषवार, मान. सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांच्या अथांग प्रयत्नाने सदर प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन, पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईन च्या कामाला कालपासून प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली. सौ. ज्योतीताई बुरांडे, उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी पाईप लाईन चे काम सुरू असताना प्रत्यक्ष उपस्थित होते. गावाच्या प्रथम नागरिक ग्रा.पं.चेक हत्तीबोडी सरपंच सौ.नेहाताई पेंदोर, उपसरपंच ग्रा.पं.चेक हत्तीबोडी श्री. धनराज सातपुते, वासुदेव पाल, तसेच आधार न्यूज नेटवर्कचे पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी श्री. स्वप्निल मंडोगडे उपस्थित होते.


सर्व जनतेने उष्णघातात काळजी घ्यावी. सर्वांनी मिळून नियमांचे पालन करावे. आपली व आपल्या परीवाराची काळजी घ्यावी:- आधार न्युज नेटवर्क जिल्हा चंद्रपूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने