Top News

डाॅ .आनंदरावजी चांदेकर पोंभुर्णा यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन पोंभुर्णा येथे काल भव्य रक्तदान शिबिर.

सर्व रक्तदात्याचे तसेच रक्तदान शिबीराला सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे रक्तदान महादान फाऊंडेशन पोंभुर्णा तसेच चांदेकर परिवारांनी  मानले आभार.
Bhairav Diwase.   May 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्‍या लॉकडाऊनमुळे रक्‍ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोंभुर्णा तालुक्यात दिनांक 28/05/2020  रोजी डाॅ.आनंदरावजी चांदेकर पोंभुर्णा यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन पोंभुर्णा येथील चिंतामणी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला लाकडाऊन च्या काळामध्येही कोरोनाच्या विषाणू ला  न घाबरता सर्व नियमाचे पालन करत नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्या मध्ये एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान महादान शाखा पोंभुर्णा यांच्या वतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले, या मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली या रक्तपेढी चे प्रमुख डाॅ.ताराम आणि त्यांची संपुर्ण टिम चे योगदान मिळाले. त्या बद्दल सर्व रक्तदात्याचे तसेच रक्तदान शिबीराला सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे रक्तदान महादान फाऊंडेशन पोंभुर्णा तसेच चांदेकर परिवारांनी  मनःपूर्वक आभार मानले. तसेच सर्व रक्तदात्यांना प्रमाणात देण्यात आले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने