Click Here...👇👇👇

राजूरा तालूक्यातील कोहपरा येथे रोटावेटरमध्ये सापडल्याने शेतकऱ्याचे दोन्ही पाय निकामी.

Bhairav Diwase
ऐन शेतीचा हंगामात दोन्ही पाय निकामी झाल्याने कुटूंबावर मोठे कोसळल संकट .
Bhairav Diwase.    May 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
राजुरा:- शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर सूरु होते. चालकाच्या मागील बाजूने बसून असलेल्या शेतकऱ्याचे दोन्ही पाय रोटावेटरमध्ये सापडल्याने गंभीर दूखापत झाली. दोन्ही पायाचे तळवे अर्ध्याहून अधिक कापले गेले आहेत. ही घटना राजूरा तालूक्यातील कोहपरा येथे घडली. मोहन पिंगे असे अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना आज ( शनिवार ) पहाटेचा सुमारास घडली. उपचारासाठी जखमी शेतकऱ्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
राजूरा तालूक्यात येणाऱ्या कोहपरा या गावातील शेतकरी मोहन पिंगे यांनी शेतात नांगरणीचा कामाला सूरवात केली होती.

आज ( शनिवार ) पहाटेपासून शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर करणे सूरु होते. ट्रॅक्टर चालकाच्या मागील बाजूस मोहन पिंगे बसले होते. दरम्यान, रोटावेटरमध्ये काहीतरी अडकले अन ट्रॅक्टरला धक्का बसला. या धक्क्याने मोहन पिंगे खाली घसरले.
त्यांचे दोन्ही पाय रोटावेटरमध्ये अडकले. दोन्ही पायाचे तळवे अर्ध्यापेक्षा अधिक कापल्या गेले. याची माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी धाव घेतली. पिंगे यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ऐन शेतीचा हंगामात दोन्ही पाय निकामी झाल्याने कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.