🔴 चंद्रपूर एल.सी.बी.पोलिस पथकाची कारवाई.
🔴पोंभुर्णा परिसरातील व्यापाऱ्यांत उडाली खळबळ.
Bhairav Diwase. May 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपुर गुन्हे शाखा पोलीस विभागाच्या गुप्त कारवाईत आज शुक्रवार ला पोंभुर्णा येथील सुगंधित तंबाखू व्यापारी सचिन नानाजी लेक्कलवार यांच्या शास्त्रीनगर वार्ड न.14 येथील राहते घरात एल.सी.बी. पोलिस पथक चंद्रपुरने धाड टाकुन 33 हजार रुपयाचा मुदेमाल 10 पॉकेट सिल्व्हर व 500 ग्रॅम चे क्रेज पॉकेट सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढिल कारवाई अन्न व औषध, प्रशासन करित आहे.
महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षांपासून सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री वर बंदी घातली आहे. पण पोंभुर्णा तालुक्यात व शहरात सुगंधित तंबाखू ची खुलेआम तस्करी होत होती. प्रशासन खळबळून जागे झाले. व सापळा रचून याची गुप्त माहिती एल.सी.बी.पथकाने मिळवली. या एल.सी.बी.पोलीस पथकाने पोंभुर्णा येथे बेकायदेशीर सुंगधीत तंबाखूची विक्री करणारा व्यापारी यांच्या घरी धाड टाकून सिल्वर पाकेट व क्रेज बॅग असा एकुण ३३ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या आरोपी व्यापारीचे नाव सचिन नानाजी लेक्कलवार असे असून तो मागील अनेक वर्षापासून सुगंधित तंबाखू ची तस्करी करीत होता.
यापूर्वी सुद्धा त्यांचेवर दुसऱ्या जिल्ह्यात हीच मोठी कारवाई करण्यात आली होती. आज एल.सी.बी.ने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर कारवाई चंद्रपुर एल.सी.बी.पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.महेंद्र बुजाडे, मनोज रामटेके, अविनाश दुशमवार, कुंदन वाढई यांनी केली आहे. पुढिल तपास अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी करित असताना त्याच्या घरीच हा बेकायदेशीर तंबाखू बनविण्याचा मोठा गोरखधंदा चालतो, त्यामुळे त्याचा घराची कसून चौकशी केल्यास मोठा साठा समोर येऊन मोठे बिंग फुटण्याची चर्चा नागरिकांत केल्या जात आहे.