सर्व मजुरांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान केमारा-देवाडा जिल्हा परिषदचे सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी केले.
Bhairav Diwase. May 04, 2020
पोंभुर्णा: कोरोना संसर्ग साखळी ताेडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घाेषीत करण्यात आले. आणि वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. शिक्षणासाठी, राेजगारासाठी गेलेले अनेक लाेकं जिथल्या तिथे अडकून पडले. पोंभुर्णा तालुक्यातील गंगापूर नविन येथील 68 मजुर मिरची काढण्यासाठी तेलंगाणा मध्ये गेले होते. त्याचप्रमाणे कसरगठा, घनोटी, उमरी पोतदार, सातारा कोमटी, डोंगरहळदी तुकुम, बोर्डा झुल्लूरवार, केमारा, देवई, या गावचे मजुर तेलंगणा येथे मिरची तोडण्यासाठी गेले होते. लॉकडाऊन मुळे ते तिथेच अडकून पडले होते पण आज लोकनेते विकासपुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनखाली ते सर्व मजूरांना आज स्वगावी आण्यात आले. त्या सर्व मजुरांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहेत. त्यांना मास्क, सॅनिटयझर, बिस्किट देण्यात आले. सोबत भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मजुरांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी केले आले.