पाेंभूर्णा तालुक्यातील नवेगाव माेरे येथील आर्या नंदकुमार कुंबरे वय १३ वर्ष. हि केरळमधील मुलीच्या वसतीगृहात अडकून पडली.
Bhairav Diwase. May 04, 2020
पोंभुर्णा: कोरोना संसर्ग साखळी ताेडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घाेषीत करण्यात आले. आणि वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. शिक्षणासाठी, राेजगारासाठी गेलेले अनेक लाेकं जिथल्या तिथे अडकून पडले. पाेंभूर्णा तालुक्यातील नवेगाव माेरे येथील एका शेतकऱ्याची मुलगी लाकडाऊनमुळे अडकून पडली आहे. तिच्या आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. तिच्या शेतकरी वडिलांनी अधिकारी, पदाधिकारी यांचेशी संपर्क केला, अनेकांना विनंती अर्ज सादर केले. मात्र २४ मार्च पासून सुरू असलेला आटापिटा अजूनही सुरूच आहे. पाेंभूर्णा तालुक्यातील नवेगाव माेरे येथील आर्या नंदकुमार कुंबरे वय १३ वर्ष. हि केरळमधील मुलीच्या वसतीगृहात अडकून पडली आहे.
आर्या केरळ राज्यातील मुठवारा जंक्शन, पुराना तुकडा त्रिशूर, शारदा मठातील शारदा सेकंडरी हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत हाेती. आर्यांच्या परिक्षेचा १९ मार्चला शेवटचा पेपर हाेता. नंतर ती गावाकडे येणार हाेती. वडिलांनी २२ मार्चला केरळ एक्स्प्रेसमध्ये तिकिट आरक्षित केले हाेते. २३ मार्चला वडिल नंदकुमार कुंबरे तिरूपति पर्यंत पाेहचले आणि २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाली. यामुळे ते अर्ध्यातूनत परत नवेगाव माेरे ला आले. आर्या अजूनही केरळमध्येच अडकून पडली आहे. आर्यांच्या वडिलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्या साेबत ब्रम्हपूरी येथील एक, नागपूरातील दाेन व चंद्रपूरातील दाेन मुली साेबतीला असून तेही तिथेच अडकून पडले आहेत.
महाराष्ट्र शासनाने व जिल्हा प्रशासनाने केरळात अडकलेल्या आर्यांला व साेबत असलेल्या मुलींना तेथून आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती आर्यांच्या वडिलांनी प्रशासनाकडे केली आहे.