Top News

पोंभुर्णा तालुका भाजपच्या शिष्टमंडळाचे श्री तहसीलदार साहेब यांना निवेदन.

महाराष्ट्रात कोरोणा संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी.
Bhairav Diwase.   May 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- संपूर्ण जगात कोरोणा महामारीने हाहाकार सुरू आहे. अशा स्थितीत राज्य सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे राज्यात दिवसागणिक कोरोणा हातपाय पसरवित चाललेल्या आहे. राज्यात कोरोणा बाधितांची संख्या रोजची वाढत आहे. आरोग्य यंत्रणेत सुसूत्रता दिसत नाही, कोरोणा योध्दे म्हणून लढणार्‍या डॉक्टर नर्सेस आणि पोलीस कर्मचार्‍यांना पाहिजे तश्या सोयीसुविधा नाहीत. अशा भयावह परिस्थितीत वाढते संक्रमण रोखून राज्य पूर्वपदावर आणण्यात सरकारला सपशेल अपयश येत असल्याचे स्पष्ट होते. शिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्यात तीनतेरा वाजल्याचे चित्र बघुन सामान्य नागरिक व्यथित आहेत. यासोबतच स्वगावी जाणारे मजूर सरकारच्या अयोग्य नियोजनामुळे काही ठिकाणी मृत्युमुखी पडले. तर काहींना घराच्या दिशेने अजूनही पायी पायपीट करावी लागत आहे. हे अत्यंत दुःखद आणि निंदनीय आहे. तसेच हातावर पोट घेऊन जगणारे कामगार असतिल, मजूर असतिल, ऑटोरिक्षा चालक, पानटपरी व्यावसायिक, सुतार, लोहार, न्हावी, चांभार, फुटपाथवर पोट भरणारे बांधव इत्यादींचे दररोजच्या रोजंदारीवर दिवसाचे भागते. परंतु सद्यस्थितीत राज्यात संचारबंदी असल्याने यांच्या हातचे काम गेलेले आहे. त्यामुळे यांच्याविषयी काही ठोस निर्णय घेऊन त्यांच्यावर उपासमारीची पाळी येवू नये. यासाठी राज्य सरकारने काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. अशामुळे महाराष्ट्रात भीतीचे आणि सामान्य माणसाच्या मनात राज्य सरकारविषयी असूयेचे वातावरण निर्माण होत आहे.
म्हणून कोरोणा संकट हाताळण्यात राज्य सरकारला दिवसेंदिवस येत असलेल्या अपयशायाबाबत लक्ष वेधण्यासाठी आज मा. खटके साहेब तहशीलदार साहेब पोंभुर्णा यांना भारतीय जनता पार्टी तालुका पोंभुर्णा यांचे वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी, भाजपच्या तालुका पोंभुर्णा अध्यक्ष श्री गजानन गोरंटीवार, पं. स.  सभापती कु.अल्काताई आञाम सौ. जोती बुंराडे उपसभापती प.स. श्री ईश्वर नैताम महामंञी भाजपा तालुका श्री विनोद देशमुख माजी उपसभापती व प.स सदस्य, श्री अजीत मंगळगीरीवार नगरसेवक, बंडु बुंराडे सरपंच आदी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने