Top News

गोंडपिपरीत साठ हजाराचे चोर बीटी बियाणे जप्त.

   सीमावर्ती नाक्‍यावर कारवाई
Bhairav Diwase.   May 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात  कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने हंगामी पेरणीकरिता बीटी बियाण्यांची गरज असते. अशातच गेल्या अनेक वर्षांपासून बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांनी बोगस बीटी बियाणे विक्रीचा गोरखधदा चालविला असून तालुक्‍यासह इतरत्रही आपले जाळे पसरविले आहे. काल रात्रपाळी दोन दुचाकीस्वारांनी बोगस बीटी बियाणांचे 74 पाकिटे नेत असताना सीमावर्ती भागात लावलेल्या तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान  आढळले असता पोलिसांनी बियाणे जप्त  करून कारवाई केली.
तालुका कृषी अधिकारी नी दिलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील मौजां तारसा (बुज.) येथील रामदास हींगणे  वय 38, व दिलीप हिंगणे वय 32 हे दोघेही दुचाकी क्रमांक एम एच 34  बी पी 65 12 या वाहनावर 74 बीटी बियाण्यांचे अंदाजे 60 हजार किंमतीचे पाकीट घेऊन वाहतूक करीत असताना वैनगंगा नदी तीरावरील तपासणी नाक्यावर थांबली असता त्यांच्याजवळ सदर अवैद्य बियाणे आढळले. यासंदर्भात तपासणी नाक्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर बाबीची माहिती लगेच पोलीस स्टेशनला कळवून ठाणेदारांना पाचारण केले. तर बियाण्यांची ओळख पटविण्यासाठी यावेळी तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनाही बोलविण्यात आले. जप्त करण्यात आलेले बियाणे ताब्यात घेऊन पोलिसांनी बियाणे वाहतूकदारांना विचारपूस केली असता ते बियाणे शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मौजा अनकोडा येथील संदीप झाडे यांचे कडून  आणल्याचे सांगितल्यावरून पोलिसांनी संदीप झाडे तथा प्रवीण येलमुल यांना ताब्यात घेऊन चौकशी अंती सुमित काळे याचेवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.


चोर बीटी तपासात अधिकाऱ्यांची जिल्हा सीमोल्लंघन?
काल रात्री पोलिसांनी चोर बीटी साठा जप्त करून चाल वीलेल्या तपासादरम्यान थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करून  मुख्य सूत्रधारा चा छडा लावला.मात्र याच दरम्यान तपासी अधिकाऱ्यांनी चक्क सीमा बंदी नियमांचे उल्लंघन  केल्याचे बोलले जात आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण नुकतेच आढळल्याने खळबळ माजली असताना "त्या ' अधिकाऱ्यांचे सीमापार जाणे व तेथून चोर ब्युटी प्रकरणातील दोन व्यक्तींना सोबत घेऊन येणे. या प्रकारची शहरात खमंग चर्चा सुरू असताना शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर  काय कारवाई  होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने