Top News

चिंतामणी महाविद्याल पोंभूर्णा यांची व्हिडीओ कॉन्फरन्सने ऑनलाइन सभा.

प्राचार्य डाॅ एन एच पठाण यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय अधिकारी यांची ऑनलाइन पोर्टल द्वारा उपस्थित.
Bhairav Diwase.   May 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चिंतामणी महाविद्याल पोंभूर्णा  येथे नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्स पार पडली आहे कॉलेजचे प्राचार्य डाॅ एन एच पठाण यांच्या नेतृत्वाखाली  ऑनलाईन मिंटिग घेण्यात आली. या ऑनलाईन सभेमध्ये महाविद्यालयामध्ये ताळेबंदी लागण्यापूर्वी पूर्ण झालेल्या विविध अभ्यासक्रमाचे नोंद घेण्यात आली. या सभेत गोंडवाना विद्यापीठाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या विविध परिपात्रकांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. तसेच शासनाद्वारे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या परीक्षा पद्धतीवर चर्चा करण्यात आली. या ताळेबंदी च्या काळात प्राध्यापक वृंदांनी विविध शैक्षणिक उपक्रमात भाग घेऊन त्याचा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कसा उपयोग होईल, यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. लाॅकडाऊन मध्ये शिक्षकांनी काय केले, याचा अहवाल घेण्यात आला. तसेच अनेक बारीकसारीक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. व त्यावर सुचना देण्यात आल्या, विषयाची मांडणी प्राचार्य डॉ एन एच पठाण सरांनी केली. तर आपण आधुनिक पध्दतीने विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकवू शकतो. यावर साधक बाधक चर्चा डाॅ नरवाडे मॅडमनी केली. या मिंटिगच्या यशस्वीतसाठी प्रा.गिरीपुंजे सर, प्रा.घोडेस्वार सर, प्रा.गुडधे सर, प्रा.डाॅ बावनकुळे सर, प्रा. चौधरी सर, विरूटकर सर, अल्याडवार सर, कटारे सर, व डोनेवार सर उपस्थित होते. या मिटिंचे आभार प्रा.उगेमुगे सरांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने