गावातील पाणी टंचाईची समस्या दुर करण्यासाठी प्रयत्न करीन:- सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा.
Bhairav Diwase. May 25, 2020
पाेंभुर्णा:- भारत देशात नाही तर जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना, संस्था, व्यक्ती या लढाईत आप-आपला योगदान देत आहे. काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसत आहे.
पण आता उन्हाळा चालू झाल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. गाई गुरांना पाणी शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. व गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. असच पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत चेक हत्तीबोडी रा लच्छमपुर येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. गावात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी लक्ष्मणपुर येथे जाऊन गावाची पाहणी केली. त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील पाणी टंचाईची समस्या दुर करण्यासाठी प्रयत्न करीन असा गावातील नागरिक शब्द दिला.