Top News

सावली तालुक्यातील जिबगाव येथे कोरोनाच्या लाॅकडाॅऊन मध्ये सोशल डिस्टन ठेवुन आटोपले लग्न.

ना वाजा ना गाजा ना करता साध्या पद्धतीने लग्न.
Bhairav Diwase.   May 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील जिबगाव येथील  ज्ञानदेव पाल याची मुलगी  दामीनी हिचे लग्न चामोर्शी तालुका येथून जवळ असलेल्या वेलतूर तूकूम येथील श्री आनंदराव धोटे याचा मुलगा मनोज याचेशी लग्न जुळले. आणि दि 28/03/2020 ला लग्न करण्याचे ठरले होते. पत्रिका  वाटप करून झाले, पंरतु कोरोनाचे संकट आले त्यामुळे सर्वत्र लाँकडाऊन असल्यामुळे लग्न करायचे की नाही या चितेंत दोन्ही पक्ष पडले जिबगाव येथील तंटामुक्त समीती अध्यक्ष श्री राकेश गोलेपल्लीवार यांनी  व्याहाडखुर्द येथे डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समीती व्याहाडखुर्द याचेंशी सपंर्क सांधला आणि सर्व शासनाच्या माहिती प्रमाणे आपल्याला लग्न करावा लागेल ना वाजा ना गाझा, ना बाहेरील पाहुणे मंडळी.
  आपल्याला सोशल डिस्टन्सचे अंतर ठेवून माँस्क बाधुन व पाच-पाच लोक कार्यक्रमात राहतील असे समजविण्यात आले त्यावर दोन्ही पार्टी तयार झाले त्यानंतर दि24/05/2020ला  दूपारी 1.30 वाजता ज्ञानदेव पाल जिबगाव यांचे घरी लग्न लावण्यात आले यामध्ये  मुलीचे-मुलाची आई, वडील, राकेश गोलेपल्लीवार, पुंडलीक पाल, आशीष वडुले, डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समीती व्याहाडखुर्द, याचे उपस्थित विवाह पार पाडण्यात आले. अगदीं सांध्या पद्धतीने विवाह सोहळा साजरा करण्यात आला. ना वाजा ना गाजा ना करता साध्या पद्धतीने डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांच्या उपस्थित राहून विवाह पार पडला अगदी साध्या पद्धतीने आणि पाहुणे कमी या मध्ये विवाह कोरोनाच्या लाँकडाऊन मध्ये विवाह करण्यात आला आणि मनोज दामीणीला शुभ आशीर्वाद देण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने