Top News

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पाथरी पोलीस स्टेशनचे अधिकारी स. पो. नि. श्री योगेश घारे यांची दबंग कार्यवाही.

अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला चांगलाच धसका.
       Bhairav Diwase.   May 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- कोरोनच्या संकटकाळी प्रामाणिक पणे कर्तव्य बजावून नुकतेच पोलीस स्टेशनं पाथरी येथे रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी श्री योगेश घारे नागरिकांची काळजी घेत नियमांचे पालन करण्याचे सूचना करीत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची  वेगळीच छाप निर्माण झाली आहे. पाथरी पोलीस स्टेशनं येथे रुजू होताच देशामध्ये कोरोना विषाणूचे संकट आले. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला परंतु श्री घारे साहेब आपले कर्तव्य निभावत जनतेची काळजी घेत कोरोना विषाणूचा सामना करीत आहेत. सोबत कार्यरत असलेले कर्मचारी सुद्धा त्यांना प्रामाणिक पणे सहकार्य करीत आहेत. 
   
पाथरी पोलीस स्टेशन येथे रुजू होताच त्यांनी काही पोलीस कर्मचारी यांना परिसराची गुप्त माहिती घेण्याचे आदेश दिले असता या परिसरात अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती झाली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक   मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी साहेब तथा पोलीस उपविभागीय अधिकारी  मा. श्री अनुज तारे साहेब  मुल यांचे मार्गदर्शनात स. पो. नि. श्री घारे साहेब तथा पोलीस  उप निरीक्षक श्री चव्हाण साहेब यांनी  पोलीस कर्मचारी  क्राईम राईटर श्री मनीष गेडाम, पोलीस शिपाई श्री किशोर, प्रदीप, प्यारेलाल यांना गुप्त माहिती घेण्याचे आदेश देऊन माहिती मिळताच ठिकठिकाणी अवैध व्यावसायिक यांचेवर कार्यवाही करण्यात आली. त्यात दारू, जुगार, सुगंधित तंबाखू, विक्री व पुरवठा या अवैध व्यावसायिक यांचेवर कार्यवाही करून माहे मे 2020 ते आजपर्यँत एकूण 16 कार्यवाही करण्यात आल्या असून 18 आरोपी 3 दुचाकी व दारू मुद्देमाल सहित 2,92,550/- चा माल जप्त करण्यात आलेला आहे. 2 जुगार कार्यवाही मध्ये 16 आरोपी व  5,790/- मालासहित जप्त करून कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच सध्यस्थितीत सुगंधित तंबाखू व खर्रा यांची वाहतूक व  विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच नाकाबंदी करून 2 कार्यवाही केल्या गेली आहे त्यात सुगंधित तंबाखू व दुचाकी सह 73600/- चा माल जप्त करण्यात आलेला आहे. पाथरी परिसरात स. पो. नि. श्री योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी हे अवैध व्यावसायिक व गुन्हेगारी प्रवृत्तीवर लक्ष ठेवले असून. धडक कार्यवाही केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी चांगलाच धसका घेतला असून त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. स. पो. नि श्री घारे साहेब व पोलीस उपनिरीक्षक श्री चव्हाण साहेब यांच्या दबंग कामगिरीची परिसरात चर्चा असून त्यांच्या कार्याचे परिसरात कौतुक केल्या जातं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने