Click Here...👇👇👇

चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा च्या रा.से.यो स्वयंसेवक आणि स्वयंसेविकां कडुन चेक आष्टा गावात मास्कच वाटप.

Bhairav Diwase
🔴 गोंडवाणा विद्यापीठ, गडचिरोलीच्या अंतर्गत चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उपक्रम.
Bhairav Diwase.   May 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- देशात कोरोना विषाणूंमुळे हाहाकार माजला असतांना त्याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासन पातळीवरून शर्थीचे प्रयत्न अविरत सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गोंडवाणा विद्यापीठ, गडचिरोली च्या रासेयो विभागाचे संचालक डॉ. नरेश मडावी यानी गरजुना फेस मास्क वाटण्याचे आव्हान समस्त स्वयंसेवकांना केले आहे. या आव्हानाला प्रतिसाद म्हणुन चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक आणि स्वयंसेविकांनी घरी स्वतः मास्क बनवुन आपल्या चेक आष्टा येथे नागरिकांना वाटप केले. 
        सदर काॅलेजचे प्राचार्य डॉ. एन एच पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा धर्मदास घोडेस्वार सर, यांनी रासेयो स्वयंसेवकांना घरी मास्क तयार करून आपआपल्या गावातील परिसरात शासनाकडून मिळालेल्या संपूर्ण नियमांचे आणि सोशल डिस्टेन्सिंगचे काटेकोर आणि तंतोतंत पालन करून  लोकांना कोरोना विषाणू संदर्भात जागृती व प्रतिबंधक माहीती सांगून आवश्यक लोकांना मास्क वितरीत करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करीत स्वयंसेवक आणि स्वयंसेवकांनी चेक आष्टा या गावात मास्क वितरीत केले.

       तसेच प्रा उगेमुगे सर, प्रा डॉ बावनकुळे सर, प्रा चौधरी सर, प्रा गुडधे सर, प्राध्यापिका डॉ सूर्यतळे (नरवाडे) मॅडम, प्राध्यापिका कामले मॅडम, प्रा मडावी सर व शिक्षकेत्तर कर्मचारी हा कार्यक्रम राबविण्यासाठी सहकार्य करत आहे. याकरिता चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविकांनी मास्क बनवून वाटप करुन खूप मोलाचे योगदान दिले.