Click Here...👇👇👇

शेतकऱ्यांना अतिरिक्त बोनस वाटप करा:- शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष अनिल स्वामी

Bhairav Diwase
🔵अतिरिक्त बोनसचे त्वरित वाटप करण्यात यावे. अशी मागणी.
🔵अशी मागणी राज्यमंत्री नाम. प्राजक्त दादा तनपुरे यांच्याकडे विविध कार्यकारी शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष अनिल स्वामी यांनी केली.
 Bhairav Diwase.   May 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
 सावली:- सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त  बोनस चे  वाटप करण्यात यावे अशी मागणी राज्यमंत्री नाम. प्राजक्त दादा तनपुरे यांच्याकडे विविध कार्यकारी शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष अनिल स्वामी यांनी केली आहे.
        सावली तालुका कृषिप्रधान तालुका म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात नावाजलेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नसल्याने येथील शेतकरी शेतीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. शासनाच्या  नियमाप्रमाणे ज्या  शेतकऱ्यांनी संस्थेद्वारा धानाची विक्री केली त्यांना अतिरिक्त बोनस देण्यात येणार होते. परंतु अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सावली तालुक्यातील शेतकर्‍यांना पुढील हंगामासाठी आर्थिक चणचण भासू नये म्हणून अतिरिक्त बोनस चे  त्वरित वाटप करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष अनिल स्वामी यांनी केली आहे.