Click Here...👇👇👇

वर्धा व गडचिरोली येथे अडकलेले चंद्रपूरकर जिल्ह्यात परत.

Bhairav Diwase
🔴 स्वखर्चातून आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा मार्फत पाठविल्या होत्या २ खासगी बसेसे.
Bhairav Diwase.    May 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपुर:- संचारबंदी मध्ये चंद्रपूर नजीक असलेल्या वर्धा व गडचिरोली जिल्ह्यतील प्रवाशांना मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या पुढाकारातून स्वजिल्ह्यात आणण्यात आले. वर्धा व गडचिरोली येथे अडकलेल्या विद्यार्थी, कामगार, व इतर नागरिकांना चंद्रपूर येथे आणण्याकरिता दोन ट्रॅव्हल्स पाठविण्यात आल्या व अडकलेल्या या आपल्या जनतेला आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्वजिल्ह्यात परत आणले.
             यावेळी उपमहापौर तथा स्थायी समिती अध्यक्ष राहुलभाऊ पावडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे ,जेष्ठ नेते डॉ. मंगेशजी गुलवाडे,मा. दत्तप्रसंना महादानी , मा.प्रकाश धारने,भाजयुमोचे सूरज पेदुलवार, प्रज्वलन्त कडू ,आदित्य डवरे, सत्यम गाणार, अक्षय शेंडे यांची उपस्थिती होती.

            संपूर्ण देशात सुरु असलेल्या या संचारबंदी मुळे विविध भागात विद्यार्थी, मजुर, कामगार व इतर नागरीक पर जिल्हा व राज्यात अडकलेले आहे. अडकलेल्या आपल्या जनतेला परत आण्यास सुधीरभाऊ मूनगंटीवार पुढाकार घेत आहे. तसेच त्यांचा पुढाकारातून स्वखर्चाने अविरत पणे सेवा देणे सुरूच आहे. वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी झालेली असून त्यांना गृह अलगीकरणात करण्यात आलेले आहे