Top News

सावली पोलिसांनी पकडली अवैध दारू.

तनसिच्या ढिगाऱ्यात दारू लपवून आरोपी फरार.
Bhairav Diwase.   May 27, 2020
  
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-
पोलिस स्टेशन सावली  दिनांक 26/05/2020 रोजी मा.सहाय्यक पोलिस अधिक्षक सा.श्री. अनुज तारे सर. उपविभाग मुल तसेच मा.सहा.पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड सा.पो.स्टे . सावली यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे.सावली येथील डि.बी. पथकाचे कर्मचारी यांनी मुखबीर खबरेवरून मौजा पारडी ते भवराळा जाणारे कच्चा रोडवर सापळा रचुन बसलो असता एक संशयीत वाहन चालक पोलिस असल्याचे पाहुन वाहनातील दारूसाठा एका तनसीच्या ढिगात लपवुन पळुन गेला . त्याचा पाठलाग केला असता मिळुन आला नाही.त्या तनसिच्या ढिगाची पाहणी केली असता . त्यात ३ प्लॉस्टिक चुंगळयात एकुण ९६० नग देशी दारूच्या बॉटल्स टायगर बॅन्ड किमंत ९६,०००/ - रू,चा माल मिळुन आल्याने सदर फरार वाहन चालकाविरुध्द पोलिस स्टेशन सावली येथे अप क १०२/२०२० कलम- ६५ ( ई ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह कलम १८८ भादवी अन्वये गुन्हा नोंद असुन,सदरची कार्यवाही मा.सहाय्यक पोलिस अधिक्षक सा.श्री.अनुज तारे सर. उपविभाग मुल तसेच सहा.पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड सा.पो.स्टे.सावली यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन सावली येथील डि.बी. पथकाचे कर्मचारी पोहवा चंद्रकांत कन्नाके,पो.शि. सुमित मेश्राम , दिपक डोंगरे,प्रफुल आडे,मपोशि प्रिती अलाम यांनी केली असुन पुढिल तपास सावली पोलिस स्टेशनचे डि.बी. पथकातील कर्मचारी करित आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने