Top News

रानडुकराच्या गंभीर दुखापत झालेल्या महिलेलातात्पुरता उपचार करून दिली सुट्टी.

जखमी महिलेवर योग्य उपचार करण्यासाठी शासन प्रयत्न करावे व महिलेची उपासमार होऊ नये. या साठी वनविभाग कडून मदत मिळावी अशी महिलेच्या कुटुंबीयांनी मागणी.
Bhairav Diwase.   May 22, 2020 

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-
सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या वनबिटातील व्याहाड ( बुज.) येथील महीला रानडुक्कर च्या हल्ल्यात जखमी झाली. तिच्या पायाला जबर मार लागला व रक्तस्त्राव सुरु होता मात्र योग्य पद्धतीने उपचार न करता सुट्टी दिली. असल्याचा आरोप महिलेच्या परिवाराने केला आहे. शालु राजू कोसरे वय (४०) रा.व्याहाड (बुज) सदर महिला या तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी 13/05/2020 रोज बुधवारला जंगलात गेल्या असता दुपारी २.२० वाजता रानडुक्कराने अचानक मागून येऊन महिलेवर हल्ला केल्याने यात सदर महिलेच्या पायाला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली असता. त्या महिलेला व्याहाड बुज येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले . रक्तस्त्राव जास्त होत असल्याने त्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले. मात्र चार दिवस थातूरमातूर उपचार करुन तेथिल नर्सने आपल्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे जावे लागेल म्हणून अर्ध्या उपचारावर सुट्टी दिली. राज्यात कोरोना संसर्ग आजाराने थैमान घातले असून संपूर्ण प्रशासन या महामारीच्या उपाययोजनेत असतांना मात्र बाकीच्या रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. लाँकडाउन मूळे हाताला काम नाही या मनस्थितीत असतांना सामान्य जनतेने काय करावे. गरिबाच्या मदतीसाठी कोण धावून येतात म्हणून सदर महिला आणि घरातील कोसरे कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. सदर महिलेच्या पायाला जबर मार असून खाली पडल्याने एक दात पडून पाच दात हलत असल्याने त्यांना जेवण करतांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. सदर महिला जिवाच्या आकांताने विव्हळत असतांनाही जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली मधून उपचाराविनाच सुट्टी कशी काय देण्यात आली? असा प्रश्न पडत आहे. सदर जखमी महिलेवर योग्य उपचार करण्यासाठी शासन प्रयत्न करावे व महिलेची उपासमार होऊ नये या साठी वनविभाग कडून मदत मिळावी अशी महिलेच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने