Top News

पोंभुर्णा तालुका भाजपातर्फे राज्यसरकार विरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन.

भाजपा कार्यालयात  पोंभुर्णा भाजपाच्या तालुकाध्यक्ष गजानन  गोरंटीवार यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी 'ठाकरे सरकारचा निषेध असो!' अशा घोषणा देऊन निषेध.
Bhairav Diwase.   May 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभूर्णा:- संपूर्ण जगावर कोरोणा महामारीने हाहाकार माजवून आहे. अशात महाराष्ट्रातील जनतेच्या दुर्दैवाने म्हणा कोरोणाचा धोका दिवसागणिक गडद होत चाललेला आहे. परंतु अजुनही राज्य शासन आणि प्रशासन आणीबाणीची ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे. केंद्र सरकारने या परिस्थितीवर अनेक महत्वपूर्ण उपाययोजना करत एक अभूतपूर्व जम्बो पॅकेजही घोषित केले आहे. तसेच अनेक राज्यांनी केंद्राच्या घोषणे आधी तर काहींनी नंतर स्वतःच्या राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध पॅकेज घोषित केले आहेत. पण दुर्दैव महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार मात्र अजुनही हातात कटोरा घेऊन उभा आहे. अद्यापपावेतो केंद्राकडे बोट दाखवण्याशिवाय कुठलेही ठोस पाऊल राज्यातील ठाकरे सरकारने उचलेले दिसत नाही. त्यामुळे अशा निष्काळजी, नाउमेद सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज सकाळी पोंभुर्णा शहरातील भाजपा कार्यालयात  पोंभुर्णा भाजपाच्या तालुकाध्यक्ष गजानन  गोरंटीवार यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी 'ठाकरे सरकारचा निषेध असो!' अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

  याप्रसंगी, कु अल्का आञाम सभापती सौ.शेत्ता वनकर अध्यक्ष नगरपचायत  सौ.जोती बुंराडे उपसभापती राहुल संतोशवार जि प स. ईश्वर  नैताम महामञी  विनोद देशमुख प.स.स, अजीत मंगळगीरीवार नगरसेवक  मोहन चलाख  नगरसेवक सौ .सुनीता म्याकलवार नगरसेवक सौ नेव्हा बघेल नगरसेवक कु शारदा कोडापे नगरसेवक गंगाधर मडावी प.स.स, किशोर कावळे नगरसेवक  वीजय कस्तुरे नगरसेवक राजु ठाकरे आदि  तथा अन्य स्थानिक कार्यकर्ते सोशल डिस्टेंसिंआपगचे पालन करीत आपआपल्या बुथ वर कार्यक्रम आयोजीत करुण  उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने