ना वरात, ना गाजा वाजा, ना फटाके, ना नाचता, फक्त फुलांचे हार गळ्यात मंगळसूत्र अशा साधा पध्दतीने विवाह संपन्न.
Bhairav Diwase. May 22, 2020
सावली:- सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथून जवळ असलेल्या डोनाळा येथील श्री ढिवरू मेश्राम याचा मुलगा संदीप याचा लग्न कापसी येथील विजय बांबोळे ची मुलगी सिम्था हिचे सोबत संदीपचे लग्न जुळले होते आणि एप्रिल महिण्यात लग्न करण्याचे ठरविले होते.नातेवाईक याना प्रत्रिका वाटप करून झाले पंरतु कोरोना या संसर्ग आजारामुळे सरकारने महत्वाचे निर्णय घेऊन संचारबंदी व लाँकडाऊन करण्यात आल्यामूळे लग्न करायचे की नाही या चितेंत दोन्ही पक्ष पडले आणी व्याहाडखुर्द येथे मामा, आई, वडील आणि मुलगा संदीप यांनी डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समीती व्याहाडखुर्द याचेंशी सपंर्क सांधला.आणि सर्व शासनाच्या माहिती प्रमाणे आपल्याला लग्न करावा लागेल. ना वाजा ना गाझा. आपल्याला सोशल डिस्टन्सचे अंतर ठेवून माँस्क बाधुन व पाच-पाच लोक कार्यक्रमात राहतील असे समजविण्यात आले त्यावर दोन्ही पार्टी तयार झाले. त्यानंतर श्री गोपाल रायपुरे यांनी पंचशिल बौद्ध विहार व्याहाड खुर्द यांचे सोबत चर्चा करुन दि २१/०५/२०२० ला दुपारी १.३० वाजता पंचशिल बौद्ध विहार व्याहाडखुर्द येथे मंगल परीणय करण्यात आले.यामध्ये मुलीचे-मुलाची आई, वडील श्री गोपाल रायपुरे, केशव भरडकर संरपच व्याहाडखुर्द, रायपुरे मुक्तेश्वर नगराळे यांनी योग्य सल्ला देऊन पंचशिल बौध्द विहार व्याहाडखुर्द येथे विवाह पार पडला. या मंगल परिणय प्रंसगी उपासक उपासिका यांना शुभ आशीर्वाद देण्यात आला.