कोरोना ग्रस्तांसाठी एक हात मदतीचा, माणुसकीचा.
Bhairav Diwase. May 09, 2020
पोंभुर्णा:- देशात कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी जन आप आपल्या परीने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविंड19 या माध्यमातून जमा केली जात आहे. कोरोना शी मुकाबला करण्यासाठी मदतनिधी चे जिल्हाधिकारीनी केलेल्या आव्हानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक संस्था प्रतिसाद देत आहेत.
आज प्रामुख्याने मिशन मॅथमॅटिक्स ग्रुप यांनी नांदगाव/ घोसरी परिसरात बाल विद्यार्थी व संस्थेचे सदस्य यांच्या मदतीने डोनेट बॉक्स तयार करून प्रत्येक घरातून कोरोना ग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा केली. सामाजिक दायित्व समजून या संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे.
यापूर्वीही अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविलेले आहेत. कोविंड-19 च्या माध्यमातून डोनेट बॉक्स मध्ये जमा झालेली निधी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देणार, या उपक्रमात मिशन मॅथेमॅटिक्स ग्रुपचे सर्व सदस्य बाल विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले असे संस्थेचे अध्यक्ष अक्षय वाकुडकर यांनी सांगितले.