प्रशासनाने जनतेच्‍या हिताचे निर्णय त्‍वरेने करावे – आ. सुधीर मुनगंटीवार.

Bhairav Diwase
कोरोना विरोधातील हा लढा आपण सहज जिंकु असा विश्‍वास:- आ. सुधीर मुनगंटीवार
Bhairav Diwase.    May 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- कोरोना विषाणुच्‍या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने अनेक लोकप्रतिनिधी शासनाला तसेच प्रशासनाला उपाययोजना सुचवितात, त्‍या अनुषंगाने मागण्‍या करतात. मात्र प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्‍यास विलंब होत असल्‍याने अडचणी कमी होण्‍या ऐवजी वाढत आहे. या संदर्भातले गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने निर्णय घेण्‍यास विलंब न लावता त्‍वरेने निर्णय करावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व विशेषतः महाराष्‍ट्रातील कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेला दिलासा देणारे निर्णय घेताना प्रशासकीय पातळीवर विलंब होत आहे. यात सर्वसामान्‍य जनता भरडली जात आहे. ही वेळ चालढकल व टाळाटाळ करण्‍याची नसुन त्‍वरेने निर्णय घेण्‍याची आहे. बरेचदा निर्णय घेताना नियमांचे कारण सांगुन आडकाठ्या निर्माण केल्‍या जातात असेही आपण बघतो मात्र अशा आपतकालीन परिस्थितीत जनतेला न्‍याय देण्‍याची भुमिका बाळगुन जलदगतीने निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आहे. असे झाल्‍यास सर्वसामान्‍य जनतेचे मनोबल उंचावेल व कोरोना विरोधातील हा लढा आपण सहज जिंकु असा विश्‍वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे.