आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मिळावी.
Bhairav Diwase. June 13, 2020
सावली:- सावली तालुक्यातील व्याहाड बूज येथे रात्रौ १० वाजेच्या सुमारास मुकरू निकुरे व दीपक पोटे यांच्या घरावर वीज पडून 4 जण जखमी झाल्याची घटना घडली.
काल रात्रौ व्याहाड बूज परिसरात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रौ परिसरातील लोक झोपी गेले असता १० च्या सुमारास व्याहाड बूज येथील मुकरु निकूरे व दीपक पोटे यांच्या घरावर वीज पडून मुकरू नीकुरे यांचा मुलगा रुमाजी, सून शीतल, व दोन नातू जखमी झालेत व घरातील विद्युत मीटर संपूर्णपणे जळून खाक झाली. त्यांना गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर दीपक पोटे यांच्या घराची विद्युत मीटर संपूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु वित्तहानी झाली आहे.
त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत देण्यात यावे. अशी मागणी जनता करीत आहे.