🔴वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आढाव्यादरम्यान सूचना.
🔴सर्व कर्मचाऱ्यांना पावसाळी साहित्य पुरविणार.
Bhairav Diwase. June 13, 2020
चिमूर:- ग्राहक देवाचे रूप आहे. हे ब्रीदवाक्य एक व्यावसायिक वापरतो त्याचं प्रमाणे आपण शासकीय कर्मचारी जनतेकडून मिळणाऱ्या महसूलातून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करतो. त्या मुळे आपल्या वीज ग्राहकांच्या तक्रारी एकूण घेऊन त्यांच्याशी सौजन्यतेने वागून जलदगतीने सोडविण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. वादळ वाऱ्या मुळे गावपरिसरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना होणार त्रास देखील वाढला आहे. त्यामुळे ग्राहक आपल्या समस्या घेऊन आपल्या कडे येतील त्यांच्याशी सौजन्यतेने बोलून आपण त्यांच्या समस्या अगतिकतेने निकाली काढा अशा सूचना आमदार भांगडीया यांनी विजकर्मचार्यांना केल्या आहेत. कर्मचाऱ्यांशी सवांद साधून त्यांच्या समस्या एकूण घेताना एका कर्मचाऱ्याने पावसाळी साहित्य पुरविण्याची मागणी केली मागणीची त्वरित पूर्तता करत सोमवारला सर्व कर्मचाऱ्याना रेनकोट व किट उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी या वेळी दिलं.
या वेळी माजी प.स.सभापती राजू झाडे, जेष्ठ भाजप नेते बकरमाजी मालोदे, निलम राचालवर, वीज वितरण विभागाचे उपकार्यकरी अभियंता संजय जळगावकर, अभियंता राठी, कनिष्ठ अभियंता प्रवीण आसोलकर यांचे सह तालुक्यातील सर्व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
१३२ के.व्ही. कोलारी वीज केंद्र जलदगतीने कार्यान्वित करा.
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नामुळे चिमूर तालुक्यातील वीज समस्या दूर करण्यात बऱ्यापैकी यश आले आहे.त्यांच्या प्रयत्नमुळे चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील खडसंगी, जांभुळघाट, मासळ या ठिकाणी वीज वितरण उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले असून चिमूर शहराचा वीज पूरवठा भुमीगीत करण्यासाठी मोठ्या प्रणामत निधी मंजूर करण्यात आला आहे. १३२ केव्ही चे कोलारी येथे उपकेंद्र लवकरच कार्यान्वित होणार असून या मुळे तालुक्यातील विजेच्या बऱ्याच समस्या निकाली निघणार आहेत. याचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना सम्बधितांना आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केल्या आहेत.