जिल्ह्यातील इतर जिल्ह्यात बदलून गेलेले ६७ पोलीस अधिकारी असे एकूण ७६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्रीय 'आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने' गौरव.
Bhairav Diwase. June 13, 2020
चंद्रपूर:- जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचेसह ७६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात दोन वर्षांच्या वर सेवा केले बजावलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने 'आंतरिक सुरक्षा सेवा पदक' जाहीर झाले आहे.
चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना गडचिरोली जिल्ह्यात बजावलेल्या विशेष कामगिरी बाबत केंद्रीय आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले असून यापूर्वी खरतड सेवेसाठी 'विशेष सेवा पदक' उल्लेखनीय सेवेसाठी 'पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह' आणि 'शौर्य पदक' याने त्यांना गौरवण्यात आलेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेले पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक किसन शेळके, हृदयनारायण यादव, ओमप्रकाश कोकाटे, स्वप्नील धुले, दीपक गोतमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे यांच्यासह जिल्ह्यातील इतर जिल्ह्यात बदलून गेलेले ६७ पोलीस अधिकारी असे एकूण ७६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्रीय 'आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने' गौरविण्यात आले आहे.