घरी सिलेंडर स्फोट झाल्याने घर जळून राख.
Bhairav Diwase. June 13, 2020
चिमूर:- आमदार बंटीभाऊ भांगडीया हे सामाजिक कार्याचा वसा सतत ठेवत त्यांनी नुकताच झालेल्या मेटेपार येथील सुनंदा सरपाते या महिलेस आर्थिक मदत दिली
नुकताच मेटेपार येथील सुनंदा सरपाते यांच्या घरी सिलेंडर स्फोट झाल्याने घर जळून राख झाले असता. कोरोना भयानक परिस्थितीत त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तेव्हा दुःखी ताचे कैवारी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दखल घेत चौकशी केली. आपल्या खाजगी निधीतून आर्थिक मदत दिली आणि शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
सुनंदा सरपाते या महिलेस आर्थिक मदत देत असताना भाजपचे भिसी आंबोली जि. प क्षेत्र प्रमुख नितीन गभणे आकाश ढबाले, बूथ अध्यक्ष माधव ननावरे घनश्याम सावसकडे स्वप्नील लांजेवार, बाबा लोणारे, राजेंद्र चौधरी, सुखदेव शहारे, मंगेश वाघ, सभांजी शेंडे उपस्थित होते