बोगस बियानामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट.

वाढीव भावाने शेती साहित्याची विक्री जोमात, कृषी विभाग मात्र कोमात.
Bhairav Diwase.   June 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- शेतीच्या हंगामाला सुरवात होताच शेतकरी बांधवांनी शेतीसाठी बियाणे खरेदी केली.अनेक शेतकरी बांधवांनी शासनाच्या अनुदानीत बियाण्यांची वाट पाहली पण शासनाचे अनुदानित बियाणे या वर्षी पोहोचलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी दुकानात उपलब्ध असेल त्या कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले परंतु ते बियाणे उगवलेच नासल्याने शेतकऱ्यांनी परत बियाणे खरेदी केले परंतु तेसुध्दा हवे त्या प्रमाणात उगवले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.कृषी विभाग प्रत्येक कंपनीचे बियायाची उगवण शक्ती तपासूनच त्यांना कृषी दुकानात विकण्याची परवानगी देतात तर मग बियाणे उगवले का नाही हा दाट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

    देशात कोरोनाच्या संकटाने अनेक ठिकाणी शेती साहित्याची जादा भावाने विक्री केल्याच्या घटना समोर येत आहेत,लॉकडाऊन चे कारण सांगून अनेक शेतकरी बांधवांकडुन तणनाशक,बियाणे इतर उपयोगी शेती साहित्यांची जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांना लुटण्याचा व्यवसाय चिमूर तालुक्यात जोमात सुरू आहे परंतु कृषी विभागाचे याकडे लक्ष नसून प्रशाशन अजून कोमातच आहे.एकीकडे कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत तर दुसरीकडे आर्थिक पिडवणुकीने शेतकरी मोठ्या प्रमानात अडचणीत सापडला आहे.कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराची झळ आज शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने