चिमूर-वरोरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार.

लोखंडी पुल जवळील घटना.
Bhairav Diwase.   June 29,2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर वरोरा मार्गावरील लोखंडी पूल जवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात  दुचाकीस्वार  कुणाल विलास नन्नावरे वय 15 वर्ष हा हायवा ट्रक अपघातात  ठार झाला असून  एक जखमी झाला आहे 
        ताडगाव  ता समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील कुणाल विलास ननावरे हा आपल्या मित्रांसह  मोटरसायकल ने चिमूर कडे येत असताना ओव्हरटेक करण्याच्या नादा मध्ये हायवा ट्रक क्रमांक mh-40 Bl- 8663या ट्रक ने अपघात झाल्याने दुचाकीस्वार कुणाल हा जागीच ठार झाला मृतक  स्वतःमोटर सायकल क्रमांक Mh 34 X0695 ही स्वतः चालवीत होता दुसरा जखमी झाला असून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे
हायवा ट्रक पोलिसांनी पकडले असून पीएसआय रवींद्र खैरकर पुढील तपास करीत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने