आजपासून (दि.२९) गोंडपिपरीत भाजपचे शेतकऱ्यांच्या कर्ज व विजमाफीसाठी आमरण उपोषण.

विजबिल माफ करा, पुनर्गठीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा - भाजपची मागणी.

गोंडपिपरी तहसिल कार्यालयाच्या समोर होणाऱ्या या उपोषणादरम्यान माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजय धोटे, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे,भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आदींची उपस्थिती राहणार.
Bhairav Diwase.   June 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- लॉकडाऊन काळातील थकित विद्युतबिल माफ करण्यात यावे.सोबतच पुनर्गठीत शेतकऱ्यांची देखिल सरसकट कर्जमाफी करा, या मागणीला घेऊन गोंडपिपरी तालुका भाजपाच्या वतीने आजपासून आमरण उपोषणाला सुरवात केली जाणार आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना येथील तहसिलदारांमार्फत निवेदन देण्यात आले होते.
         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले.याच काळात विजबिलाचे वितरण महावितरण कंपनीकडून ग्राहकांना करण्यात येत आहे.मार्च ते जून या तीन महिन्याचे विजबिल सरासरी आणि जादा दराने आकारण्यात येत आहे.लॉकडाउन दरम्यान हाताशी काम नसल्याने जनसामान्यांपुढे विजबिलाचा भरणा करतांना त्रास होणार आहे.त्यामुळे मार्च ते जून या तीन महिन्याचे विद्युतबिल माफ करण्यात यावे,यासोबतच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराज्याचे कर्ज सरसकट माफ करावे या मागण्यांना घेऊन गोंडपिपरी तालुका भाजपाच्या वतीने आजपासून (दि.२९) आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बबन निकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गोंडपिपरी तहसिल कार्यालयाच्या समोर होणाऱ्या या उपोषणादरम्यान माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर,माजी आमदार संजय धोटे,माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे,भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आदींची उपस्थिती राहणार आहे.
       पत्रकार परिषदेत भाजपाचे कार्याध्यक्ष साईनाथ मास्टे, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, माजी उपनगराध्यक्ष चेतनसिंह गौर, पं.स.चे माजी उप सभापती मनिष वासमवार, सभापती राकेश पुन, उद्योजक निलेश संगमवार, गणपत चौधरी, मारोती झाडे, गणेश डहाळे, सुनिल फुकट आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने