Top News

पोंभुर्णा तालुक्यातील गंगापुर तलावाचे काम त्वरीत सुरू करा:- श्री राहुलभाऊ संतोषवार सदस्य जि. प चंद्रपुर

शेतकरी आर्थिक संकटातून जात असल्याने निदान या तलावाची त्वरित दुरुस्ती करुन शेतकऱ्यांना दिलासा द्या. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी केली.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोना चा प्रादुर्भाव ग्रामीण भागात पाहिजे तेवढा दिसून आला नसला तरी याची झळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. उन्हाळ्यात होणारी कामे करण्याच्या नळाखाली पुढे ढकलण्यात आलीत.  तालुक्यातील गंगापूर गावच्या तलावाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावी म्हणून जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवारांनी अनेकदा  पाठपुरावा केला हि बाब आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कानावर ही अडचण लक्षात आणून दिली आमदारांनी लघु पाटबंधारे विभागाकडे विचारणासुद्धा केली आहे.
     जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल. पा.) जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी गंगापुर लघू पाटबंधारे तलाव दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून, सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच निविदा स्विकृत करीता जिल्हा परिषदेच्या 19 जुन स्थायी समिती  सभेत सुद्धा हा विषय मंजुरीस्तव ठेवण्यात आलेला होता मंजुरी प्राप्त होताच लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे कळविले आहे पहिल्याच पाण्याने गंगापूर तलावायचा सांडवा फुटुन जमा राहायचे. ते पाणी वाहून गेले तलावाची दुरुस्ती लवकरच झाली नाही तर हजारो एकर धांन शेतीचे नुकसान होणार असून तलावा मागील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रशासकीय प्रक्रियेला किती अवधी लागेल हे सांगता येणार नसल्याचे पाणी निरर्थक वाहून गेल्यावर आम्ही करायचे काय असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. शेतकरी आर्थिक संकटातून जात असल्याने निदान या तलावाची त्वरित दुरुस्ती करुन शेतकऱ्यांना दिलासा द्या. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने