अधुऱ्या साईड बंब विना उरकला सिमेंट काँक्रेटचा रस्ता.

Bhairav Diwase
रस्ता होऊन लोटला एक वर्षाचा कालावधी.

साईड बंब विना रस्ता आपघातला देत आहे आमंत्रण.

रस्त्याच्या कडा धारदार आणि खोलगट.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- रस्ता डांबरीकरणा चा असो की सिमेंट काँक्रेट चा रस्ता तयार झाल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजू मुरूम गोट्याने बूजविल्या जातात जेणेकरून रस्त्यावर येताना रस्त्याच्या धारदार कडा लागू नये परंतु सिमेंट काँक्रेट चा रस्ता होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असताना रस्त्याचे साईड बंब चे काम पूर्ण होऊ शकले नाही परिणामी सिमेंट काँक्रेट च्या झालेल्या रस्त्या च्या दोन्ही कडा धारदार  आणि खोलगट असल्याने रस्त्या विना चालणे कठीण होऊन बसले आहे.  वनवे ट्रॅफिक असलेला हा मार्ग जरी गावातून जाणारा आणि  मोठ्या वर्दळीचा नसला तरी दुहेरी वाहन जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे रस्त्याच्या कडेला पडल्या शिवाय तरणोपाय नाही ही एकंदरीत परिस्थिती सिमेंट काँक्रेट चा रस्ता झाल्यामुळे निर्माण झाली असून अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहे सावली येथून जवळच कवठी मार्गे तीन कवाळी जवळ गेली अनेक वर्षापासून शंभर घराची ही लोकवस्ती झुडपी जंगलं जागा परिसरात वसलेली सावली मुख्यालयात असलेल्या दाट वस्ती मुळे जागे अभावी अनेकांनी तीन कवाळी सावली तुकुम्म परिसरात वास्तव्य सुरू केले एक  एक असे आजच्या घडीला शंभर घराची वस्ती या परिसरात निर्माण झाली प्रभाग क्रमांक सतरा मध्ये येणारा हा भाग गेली कित्येक वर्षापासून अनेक समस्येने ग्रस्त होता वीज पाणी नाल्या रस्ते आदींची आता सुविधा निर्माण होत असताना सिमेंट कांक्रेटचे रस्ते तयार झाले गावात जाणारा दोनशे मीटर मुख्य रस्त्याचे काम गेली एक वर्ष पूर्ण होऊनही रस्त्याच्या दोन्ही कडाचे साईड बॅंब चे काम आधुरे असल्याने अधुऱ्या साईड बंब विना उरकलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यावरून वाहतूक केली जात आहे रस्त्याच्या दोन्ही कडा धारदार आणि खोलग ट असल्याने रस्त्यावर वाहन चडविने कठीण झाले आहे साईड बांब विना रस्ता आपघाताला आमंत्रण देणा रा ठरत  आहे मात्र  अशा गंभीर बाबीकडे संबधित विभागाचे  दुर्लक्ष होताना दिसते   सदर रस्त्याचे साईड बंब चे. काम त्वरित  पूर्ण करण्यात यावे अशी मागणी  या  वस्तीतील जनतेकडून जोर धरत आहे.