प्रा. आ. केंद्र नवेगाव मोरे येथे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन उपलब्ध अॅटोमेटीक सॅनिटयझर मशीनचे लोकार्पण.

Bhairav Diwase
अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांचे शुभहस्ते उद्घाटन.
Bhairav Diwase.    July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- दिवसेंदिवस कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव आणि जिल्ह्यात वाढत चाललेली रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रांत व ग्रामीण रूग्‍णालयांत ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन बसवून त्यामाध्‍यमातुन नागरिकांना आरोग्‍य कवच प्रदान करण्‍याचा संकल्प क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. त्यानुसार आज विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रांत आणि ग्रामीण रूग्‍णालयांत ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन बसविण्यात येऊन त्यांचे ठिकठिकाणी उद्घाटन पार पडले. 
यामध्ये नवेगाव मोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात बसविलेल्या अॅटोमेटीक सॅनिटयझर मशीनचे उद्घाटन दि. 30 जुन अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांचे शुभहस्ते पार पडले. तसेच यावेळी उपस्थितांना आर्सेनिक अल्बम -30 या होमिओपॅथीक गोळ्यांसह माॅस्क, बिस्किट, इत्यादींचे वाटप करण्यात आले. 

यावेळी श्री विनोद देशमुख सदस्य पंचायत समिती पोंभुर्णा, श्री गंगाधर मडावी सदस्य पंचायत समिती पोंभुर्णा, डॉ संदेश मामीडवार तालुका वैद्यकीय अधिकारी, ओमदेव पाल महामंत्री, अजय मस्के युवामोर्चा अध्यक्ष, प्रतिभा पौरकार सरपंच, दत्ताजी मोरे उपसरपंच, डॉ शेख, डॉ देवगडे, प्रभाकर पिंपळशेडे, भगीरथ पावडे, अमोल मोरे, अमोल लोहे सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.