आ.सुधीर मुनगंटीवारांचे यश.
भाजयुमोने केली ४००० कुटुंबाची नोंद.
Bhairav Diwase. July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत महानगरातील किमान १२ हजार विना क्षिधापत्रिका धारक कुटुंबाला अन्नधान्य वाटप सुरू झाल्याने हजारो नागरिकांना कोविड१९ च्या संकटात मोठा आधार मिळाला आहे.आ.सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील विना क्षिधापत्रिका धारकांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कडे तशी मागणी केली होती. त्यावर अध्यादेश निघाल्या नंतर आता महानगरातील तब्बल १२००० कुटूंबाला वाटप सुरू झाले.यातील ४००० कुटुंबाचा शोध भारतीय जनता युवा मोर्चाने घेतला हे विशेष.
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत जे विस्थापित मजूर लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या शिधा पत्रिका नाहीत,त्यांना केंद्र शासनाने मे व जून२०२०या दोन महिण्याकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५किलो अन्नधान्य देणाची घोषणा केली. राज्यातील विना शिधाधारक सर्व विस्थापित मजुरांचा गंभीर प्रश्न यामुळे मार्गी लागला,पण चंद्रपुर महानगरात ही संख्या किती..? त्याचा शोध घेऊन त्या सर्वाना या योजनेचा लाभ देण्याच्या सूचना आ मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला केल्यावर मनपाने महानगरातील किमान ८००० कुटुंबाची नोंद केली.महापौर राखी कंचरलावार,उपमहापौर राहुल पावडे आणि नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार यांनी यासाठी पुढाकार घेतला.याच काळात भाजयुमो तर्फे लोकांना आ मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझरे यांचे नेतृत्वात भाजयुमो ने महानगरात "सुदामा अन्नधान्य किट"चे वाटप केले असता अनेकांकडे क्षिधापत्रिका नसल्याचे लक्षात येताच,त्याची नोंद करण्यात आली. एक दोन न्हवे तर ४हजार कुटुंब सुदामा किटने भाजयुमोला दिले.या४००० कटुंबाची नोंद मनपा प्रशासनाने घेतल्यावर ही संख्या आता १२००० झाली आहे.केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत विस्थापित मजूर व विना शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेत राज्यशासनाला तसे निर्देश दिले. जिल्ह्यात असे अंदाजे ३०हजार कुटुंब असून,अश्या लोकांची यादी तयार करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्यसंस्थाना दिल्या परंतु भाजयुमोंने चंद्रपुर शहरातील ४०००कुटुंबाची नोंद केल्याने मनपा प्रशासनाला मोठी मदत झाली आहे.भाजयुमो तर्फे ४८ प्रभागातील गरीब गरजुंना सुदामा किट वाटपात किमान ३०० नामोल्लेखित परिसरात४००० विना क्षीधापत्रिकाधारक आढळून आले.या सर्वांना आता नजीकच्या रास्तभाव दुकानातून प्रतिव्यक्ती ५किलो तांदूळ या प्रमाणे मे व जून साठी १० किलो तर १ किलो चना प्रति कुटुंब या प्रमाणे २ महिन्यासाठी २ किलो चना निशुल्क दिल्या जात आहे.नागरिकांना त्रास होवू नये म्हणून ४८ रास्तभाव दुकान यासाठी निवडण्यात आले आहेत.भाजयुमो जिल्हाअध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांनी नुकतीच भानापेठ वार्ड व जलनगर वार्ड येथील पाहणी केली असता वाटप सुरू असल्याचे निदर्शनास आले.कोरोनाच्या या युद्धात विनाशिधापत्रिकाधारकांना शोधण्याचे कार्य करण्यात भाजयुमोचे सूरज पेडदुलवार, प्रज्वलन्त कडू, गौरव राजुरकर, प्रशांत बोंमावार, सुनील डोंगरे, सत्यम गाणार, धम्मप्रकाश भस्मे, अमोल नगराळे, स्वाती देवाळकर, मयूर आक्केवार आणि प्रिया नांदे यांनी महत्वाची भूमिका बजावली. कोरोनात भाजयुमोची भूमिका राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरत आहे.