इतर जिल्हा व तालुक्यातून नोकरीनिमित्त सावली तालुक्यात येणार्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालावा.
मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी सावलीकरांनी निवेदनाद्वारे केली मागणी .
Bhairav Diwase. July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यात बाहेर जिल्हा व तालुक्यातील येणार्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश तात्काळ निर्गमित करा. अशी मागणी सावलीकरांनी निवेदनाद्वारे तहसीलदार पाटील यांचे कडे केली आहे.
कोरोना विषाणू च्या वैश्विक महामारी च्या संकटात सर्व जग ग्रासले असताना राज्यातसुद्धा याचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुध्दा कोरोना संसर्ग रुग्णाचा आकडा शंभरी गाठण्याकडे वाटचाल करीत आहे. सुदैवाची बाब म्हणजे सावली तालुका कोरोना विषाणूच्या सन्सर्गापासून अजूनही मुक्त आहे.
परंतु गेल्या काही दिवसापासून सावली लगतच्या ब्रह्मपुरी तालुक्यात कोरोना संसर्ग जोमाने वाढत आहे. आजच्या घडीला या विषाणूच्या संसर्गाचे 27 रुग्ण एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यात आहेत. शहरातील 11 तर 16 रुग्ण ब्रह्मपुरी ग्रामीण भागातील आहेत. शिवाय अनेक संशयित आहेत. ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, नागभीड, गडचिरोली इत्यादी ठिकाणाहून अनेक कर्मचारी सावली तालुक्यातील कार्यालयांमध्ये नोकरी करीत आहेत व ते दररोज ये-जा करीत आहेत. चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांनी दिनांक 11 मे 2020 ला सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश निर्गमित केले होते. आदेशाचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापण कायदा 2005 नुसार कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. परंतु बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सदर आदेशाचे उल्लंघन केले असून सर्रासपणे सावली तालुक्यात ये-जा करीत आहेत. फक्त कागदोपत्री मुख्यालय राहण्याचा देखावा या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे सावली तालुक्यात कोरोना या विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी सावलीकरांची इतर जिल्हा व तालुक्यातून नोकरीनिमित्त सावली तालुक्यात येणार्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालावा व मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी सावलीकरांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. बाहेरील येणार्या कर्मचार्यांवर तात्काळ प्रतिबंध केले नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी विजय गायकवाड, रोशन बोरकर, देवाची बावणे, प्रमोद गेडाम, गुणवंत सुरमवार, छत्रपती गेडाम, भौगेश्वर मोहूर्ले, विजय सातरे, मोहन गाडेवार, उमेश अल्सवार, जना गेडाम आदी उपस्थित होते.