Click Here...👇👇👇

पोंभुर्णा शहरातील विद्युत व्यवस्था सुव्यवस्थित राहण्याच्या दृष्टिकोनातून विद्युत तारांना होनारा झाडाचा अडथळा पेट्रोलिंग करून दुर करण्याबाबत दिले निवेदन.

Bhairav Diwase
नगरपंचायत पोंभुर्णा चे नगरसेवक श्री मोहन चलाख यांनी श्री कपील मनोहर भापकर कार्यालयीन अधिकषक नगर पंचायत पोंभुर्णा यांच्याकडे निवेदन.
Bhairav Diwase.   June 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा शहरात पावसाळ्याच्या दिवसात विद्युत पुरवठा नियमित सुरू राहण्याच्या दृष्टिकोनातून नगरपंचायत स्थरावर महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी पोंभुर्णा यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधुन पोंभुर्णा शहरातील विद्युत पुरवठा अखंडित राहण्याच्या दृष्टीने पोंभुर्णा शहरात जिवंत विद्युत तारेला स्पर्श करणारे झाडांमुळे भविष्यात विजेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे भविष्याकरिता याची खबरदारी म्हणून पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी समवेत नगरपंचायत पोंभुर्णा चे अनुभवी व जबाबदारी कर्मच्यारयाची नेमणुक करुन प्रत्यक्षात पाहणी देखणी होणे अत्यंत गरजेचे आहे काही शहरातील झाडांमुळे विद्युत खंडीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे भविष्यात विद्युत समस्या उद्भवू नये म्हणून आज रोजी खबरदारी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. यासाठी आज नगरपंचायत पोंभुर्णा चे नगरसेवक श्री मोहन चलाख यांनी श्री कपील मनोहर भापकर कार्यालयीन अधिकषक नगर पंचायत पोंभुर्णा यांच्याकडे निवेदन दिले. व या निवेदनाची लवकरात दखल घ्यावी हि विनंती केली आहे.