Click Here...👇👇👇

पाथरी येथील क्वॉरंटईन असलेल्या गावकरी नागरिकांनी जि. प. प्राथ. शाळेच्या परिसरात स्वेच्छेने श्रमदान करून तालुक्यात ठेवला आदर्श.

Bhairav Diwase
पाथरी येथील क्वॉरंटईन असलेल्या गावकरी नागरिकांनी केले श्रमदान.
Bhairav Diwase.   June 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क पाथरी ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम सावली
सावली:- शासनाच्या नियमानुसार कोरोना महामारीच्या  पार्श्वभूमीवर बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या गावकरी नागरिकांना 14 दिवस सक्तीचे क्वॉरंटईन केले आहे. त्यामुळे क्वॉरंटईन असलेल्या नागरिकांना कसेबसे 14 दिवस काढून आपल्या घरी जायचे आहे. परंतु असली गौण विचारसारणी दूर सारून सावली तालुक्यातील पाथरी येथील नागरिकांनी श्रमदान करून असलेल्या 14 दिवसांत शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा जणूकाही वसा हाती घेतला आहे. आपणही याच शाळेत शिकलो इथेच शिकता शिकता लहानाचे मोठे झालो त्यामुळे शिक्षणातून जे काही संस्कार घडले ते गुरुदक्षिणारुपी ऋण कसे फेडावे याची भन्नाट शक्कल लढवून असलेल्या 14 दिवसांत शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा पक्का निर्धार  केला आहे. जेव्हा केव्हा लॉकडाऊन उघडून शाळा सुरू होईल तेव्हा आपलेच मुले याच शाळेत शिकण्यासाठी येतील त्यासाठी त्यांना स्वच्छ आणि सुंदर वातावरण लाभावे ही विचारसरणी जोपासून सावली तालुक्यात निश्चितच आदर्श ठेवला आहे असे म्हणावे लागेल.