त्या नरभक्षक वाघास केले जेरबंद.

Bhairav Diwase
🔴कोलारा परिसरात दिलासा वनविभागास आले यश.
🔴आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नाला आले यश.
    Bhairav Diwase.   June 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या गावात शेतकरी शेतमजूर यांच्या कामात दहशत पसरविणारा तो नरभक्षक वाघ अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला असून त्याला जेरबंद करण्यात आल्याने या परिसरातील जनतेला दिलासा मिळाला आहे. 
                    मागील एक दीड महिन्यात कोलारा सातारा बामनगाव येथील पाच जणांचा त्या नरभक्षक वाघाने बळी घेतलेला होता या परिसरात मोठी दहशत निर्माण झालेली होती जनतेत आक्रोश वाढत होता एक एक असे पाच जण त्या नरभक्षक वाघाने भक्ष्य करून ठार केले होते 
       त्या नरभक्षक वाघास जेरबंद करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी वरिष्ठ वनविभाग स्तरावर पकडण्यासाठीचे आदेश मिळविन्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला यश आले 
        दरम्यान जीप सदस्य गजानन बुटके यांनी सुद्धा घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी सोबत संवाद साधून त्या नरभक्षक वाघास पकडण्यासाठी प्रयत्न केले होते 
       तसेच भाजपचे युवा कार्यकर्ते  प्रवीण गणोरकर गजानन गुळध्ये यांनी सुद्धा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कडे त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वारंवार मागणी रेटत होते 
             वाघाने नागरिकास ठार केले की तणाव निर्माण व्हायचा तेव्हा परिस्थिती शांत करण्यासाठी ठाणेदार स्वप्नील  धुळे यांना कसरत करावी लागत होती त्या नरभक्षक वाघास जेरबंद केल्याने त्यांनाही थोडा दिलासा मिळाला 
    नरभक्षक वाघास जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने विशेष प्रयत्न करून जेरबंद केल्याने शेतकरी शेतमजूर वर्गात शेतीहंगाम मोकळेपणाने करता येईल त्यामुळे या परिसरातील जनतेनी सुटकेचा श्वास सुटला असला तरी पुन्हा कोणता वाघाचे आगमन होईल याची शाश्वती नाही.