चिमूर कांपा रोड वरील खरकाडा जवळील घटना.
Bhairav Diwase. June 10, 2020
चिमुर:-चिमूर कांपा रोड वरील खरकाडा जवळील एका पुला जवळ माकडीन व तिचे लहान पिल्लू अपघातात ठार झाल्याची माहिती चिमूर येथील ट्री फाऊंडेशन चे सदस्य अमिता मेश्राम यांना मिळाली. त्यांनी घटना स्थळी जाऊन रस्त्याचा बाजूला खड्डा खोदुन त्या माकडीण व तिच्या पिल्ल्याला दफन केले. व याची माहिती नेरी वनविभागला दिली. यावेळी ट्री फाऊंडेशन चे सदस्य आदित्य कडू, पिंटू गौरकार, सौरभ दंदे व गावकरी व वाटसरू उपस्थित होते..