माहिती पुस्तिका जिल्हा प्रशासन व टाटा ट्रस्टच्या सहयोगाने तयार करण्यात आली.
Bhairav Diwase. June 15, 2020
चंद्रपूर:- कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर प्रशाषणा अंतर्गत विविध उपाय योजना करण्यात आले आहे ह्या उपाययोजने विषयी माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घराघरात पोहोचविता यावी यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात covid-19 माहिती पुस्तिका जिल्हा प्रशासन व टाटा ट्रस्टच्या सहयोगाने तयार करण्यात आली आहेया माहिती पुस्तिकेचे विमोचन 15 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण ताके चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन कॅन्सर हॉस्पिटलचे जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर सुमित पांडे आरोग्य शिबिर व्यवस्थापक सुरज साळुंखे सचिन दळवी उपस्थित होते.
कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवाव्यात तसेच दैनिक काम करत असताना शारीरिक अंतर राखणे मस्त कसा वापरावा सार्वजनिक खबरदारी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आयुर्वेदिक सल्ला इत्यादी माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.
नागरिकांनी covid-19 माहिती पुस्तिकेचा वापर करून कोरोना विषाणू प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.