Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यात रेतीच्या अवैध खड्यात पडून महिलेचा मृत्यू.

Bhairav Diwase
येल्याबाई शंकर कोडापे (२७) असे मृतक व्यक्तीचे नाव.
  Bhairav Diwase.   June 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील दुर्गापूर परीसरात असलेल्या C. S. T. P. S. च्या मालकीच्या जागेवर रेतीतस्करांनी मोठमोठे खड्डे केले आहे. या खड्ड्यात रेतीखाली दबून २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली आहे. येल्याबाई शंकर कोडापे (२७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिला घरी फरशी लावण्यासाठी पोत्यात भरून खड्यातून रेती नेत होती.
(श्री राम सेने कडून अवैध रेतीच्या खड्याची पाहणी.)

रेती पोत्यात भरत असताना मातीचा ढिगारा तिच्या अंगावर पडून तिचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू तिच्या लहान मुलाच्या डोळ्या देखत झाला. तर मृत्यू साठी जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. यासाठी या शोकाकुल परिवाराला कुणी भेटायला सुद्धा आले नाही. याची दखल घेत श्री राम सेना त्या परिवाराच्या मदतीला धाऊन आली. आणि या अवैध रेती उत्खनना वर श्री राम सेना द्वारे योग्य कार्यवाही करून त्या परिवाराला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हिडिओ न्युज पहा:-  https://youtu.be/BNbUzwLJE98

मागील अनेक दिवसांपासून येथील नाला परिसरात तस्करांनी मोठमोठे खड्डे केले असून यातून शहरात रेती पोहचविली जाते. यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा पोलीस तसेच महसूल प्रशासनाला कळविले आहे. मात्र सर्वानीच दुर्लक्ष केल्यामुळे या खड्डयात महिलेचा नाहक बळी गेला आहे. दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

परंतु या महिलेच्या मृत्यू साठी जबाबदार कोण?
1. C S T P S
2. राजनितीक पक्ष 
3 रेती तस्कर