Click Here...👇👇👇

राज्यातील १४ ग्रामपंचायतींना दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहिर, चंद्रपूर जिल्ह्यातील आष्टा ग्रामपंचायतीचा समावेश.

Bhairav Diwase

पंचायत राज विभागाच्या या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण पंतप्रधानाच्या हस्ते दिल्ली येथे.
Bhairav Diwase.   June 20, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:-
ई ग्राम :केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने क्षेत्रीय पातळीवरील उल्लेखनीय विकास कामांना प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये चालू वर्षीच्या पुरस्कारांसाठी राज्यातील 14 ग्रामपंचायतींची निवड झाली आहे.

पंचायत राज विभागाच्या या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण पंतप्रधानाच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात येणार आहे. प्रत्येकी दहा लाख रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्यातील नाशिक, नागपूर, चंद्रपूर, सातारा, भंडारा, अमरावती, वर्धा, ठाणे, पुणे व हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यांसह सातारा जिल्हा व गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज व कोर्ची पंचायत समिती यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाचे सहसचिव डॉ.संजीव पटजोशी यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदांना पत्राद्वारे कळविले आहे.

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तालुका स्तरावर पडताळणी होऊन ते जिल्हास्तरावर सादर करण्यात आला. त्यांनंतर तो पंचायत राज मंत्रालयाकडे सादर करण्यात आला. पुन्हा पडताळणी होऊन विशेष अधिकाऱ्यांच्या पथकाने क्षेत्रीय पाहणी करून याबाबत निकाल जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती :

1.ब्राह्मणी, ता.जि.नागपूर

2.ओढा, ता.जि.नाशिक

3.जुगनाला, ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर

4.आष्टा, ता.पोंभूर्णा, जि.चंद्रपूर,

5.खटाव, जि.सातारा
6.कोटमगाव, ता.जि.नाशिक
7.नेरी, ता.मोहाडी,जि.भंडारा
8.परसापुर, ता.अचलपूर,जि.अमरावती
9.नांदोरी, ता.समुद्रपूर,जि.वर्धा
10.तडसर, ता.कडेगाव,जि.सांगली
11.इंजबाव, ता.मान,जि.सातारा
12.धसई, ता.शहापूर,जि.ठाणे
13.वरुड काजी, ता.सेनगाव,जि.हिंगोली
14.विठ्ठल वाडी, ता.शिरूर,जि.पुणे